डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:12 IST2022-01-11T14:09:11+5:302022-01-11T14:12:28+5:30
Murder Case : गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून कारसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या.

डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं
वॉशिंग्टन - अमेरिकेत एका जोडप्याने आधी महिलेची हत्या केली, नंतर तिच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीत सांगितले की, त्यांनी कट रचून महिलेच्या घरात घुसून लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली. जेव्हा ती अखेरचा श्वास घेत होती तेव्हा दोघेही तिच्या बेडरूममध्ये गेले आणि शारीरिक संबंध ठेवले.
हत्येनंतर चोरी
'डेली मेल'च्या बातमीनुसार, मृत महिलेचे हत्या करणाऱ्या महिलेसोबत समलैंगिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून कारसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या. अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील तुलसा येथे ४ जानेवारी रोजी ही घटना घडली. मृत महिलेचे वय 29 वर्षे आहे.
प्रियकराला 'ते' नाते मान्य नव्हते
पोलिसांनी 28 वर्षीय निकोलस जॉन्सन आणि 25 वर्षीय ब्रिनली डेनिसन यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. चौकशीदरम्यान निकोलसने सांगितले की, तो डेनिसनसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण डेनिसनचे मृत्यू झालेल्या महिलेसोबतही समलैंगिक संबंध होते. वास्तविक, निकोलसला आपल्या प्रेयसीचे तिच्यासोबतचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने हा खून केला. दोन्ही आरोपी वॉशिंग्टन काउंटी जेलमध्ये राहणार आहेत.
आरोपी कारमध्ये झोपले होते
या प्रकरणी पोलिसांनी चोरीची कार फेएटविले,अरकान्सास (Fayetteville, Arkansas) येथून जप्त केली आहे. आरोपी दाम्पत्य कारमध्ये झोपले होते. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याची चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी निकोलसने सांगितले की, डेनिसनचाही त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग होता आणि हत्येनंतर त्याने पुरावे नष्ट केले होते. हत्येनंतर दोघांनी मृत महिलेच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.