दलित सरपंचाच्या पतीची उत्तर प्रदेशात जाळून हत्या, पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 01:32 IST2020-11-01T01:32:05+5:302020-11-01T01:32:36+5:30

Crime News : अर्जुनप्रसाद कोरी (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरी यांची पत्नी छोटका या गावच्या सरपंच आहेत.

Dalit sarpanch's husband burnt to death in Uttar Pradesh, case filed against five | दलित सरपंचाच्या पतीची उत्तर प्रदेशात जाळून हत्या, पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल

दलित सरपंचाच्या पतीची उत्तर प्रदेशात जाळून हत्या, पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल

लखनौ : उत्तर प्रदेशात एका दलित सरपंच महिलेच्या पतीला पेट्रोल ओतून जाळून मारल्याने खळबळ उडाली आहे. अमेठी जिल्ह्यातील बांदोइया गावात ही घटना घडली. मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर गावातील पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
अर्जुनप्रसाद कोरी (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरी यांची पत्नी छोटका या गावच्या सरपंच आहेत. कोरी गुरुवारी बाजारला गेले होते. ते उशिरापर्यंत परत न आल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मध्यरात्री कृष्णकुमार तिवारी याच्या घराच्या मागे ते गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या कुटुंबियांनी तिवारी याच्यासह राजेश मिश्र, रविशंकर, संतोषकुमार तिवारी आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरुद्ध तक्रार दिली. लखनौ परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सत्यनारायण साबत यांनी सांगितले की, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Dalit sarpanch's husband burnt to death in Uttar Pradesh, case filed against five