शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 17:35 IST

औरंगाबादेतून रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरले या तिघांना ताब्यात घेतले, तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग  (सीबीआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने कालपासून रात्रभर कारवाई केली. कारवाईअंती औरंगाबादमध्ये पहाटेच्या सुमारास तपास यंत्रणांनी आरोपी सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात पिस्तूल सापडले असून या पिस्तूलनेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा दाढ संशय तपास यंत्रणांना आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अजिंक्य सुरले अशी या तिघांची नावे आहेत. तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

नालासोपारा येथे स्फोटके सापडल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सीबीआय आणि एटीएसने शनिवारी सचिन अंदुरेला अटक केली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास औरंगाबादमध्ये केलेल्या कारवाईत सापडलेले पिस्तूल हे डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हे पिस्तूल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय याप्रकरणात कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध आहे का याचाही तपास होणार आहे.    

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटक