Video : डी. के. राव हस्तक हत्याप्रकरण : मालमत्तेच्या वादावरून हत्या केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:18 IST2018-12-31T19:16:35+5:302018-12-31T19:18:31+5:30
ही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Video : डी. के. राव हस्तक हत्याप्रकरण : मालमत्तेच्या वादावरून हत्या केल्याचा संशय
मुंबई- कुख्यात गुंड डि.के.रावचा हस्तक टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इम्रान कुरेशीला ठोकण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे. ही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सायन कोळीवाडा परिसरातील म्हाडा कॉलनीतील सूर्यनिवासमध्ये राजा तिसऱ्या मजल्यावर राहत होता. 7 डिसेंबरला भरदिवसा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (41) हा घरी असताना अमजद आणि इम्रान यांनी घरात घुसून हत्या केली होती. हत्या झाली त्यावेळी राजा एकटाच घरी होता. त्यावेळी या दोघांनी त्याच्या घरात घुसून चाकूने राजावर सपासप असंख्य वार केले. तसेच मृत्यूनंतर ही त्याचा गळा सुऱ्याने चिरून त्याच्या डोक्यात एक गोळी झाडली. या हत्येनंतर आरोपींना तेथून पळ काढला. मात्र, त्यांची दुचाकी चालू न झाल्यानंतर ती तेथेच सोडून आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. तपासात राजाची हत्या करणारे इम्रान आणि अमजद खान हे दोघे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात अमजद मकबूल खान हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलिसांना मिळताच त्यांच्या पथकाने 16 डिसेंबरला खानला अमजदला अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी इम्रान पोलिसांच्या हाती लागत नव्हता. नववर्षांच्या पूर्वसंध्येसाठी इम्रान नवी मुंबईतील कळंबोली येथील राहत्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.