सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:42 IST2021-09-27T13:41:21+5:302021-09-27T13:42:06+5:30
Cylinder blast destroys house :घटनेच्या वेळी सर्व मंडळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली.

सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना
लाखनी (भंडारा ) : लाखनी तालुक्यातील गुरढा येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घरच उध्वस्त झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी सर्व मंडळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली.
माहितीनुसार, आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचास्फोट झाला. स्फोट होताच आग लागल्याने घरातील अन्न, धान्य, कपडे, अलमारी यासह अन्य जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच लाखनी येथील नायब तहसीलदार उरकुडकर, समन्वयक नरेश नवखरे, तलाठी देशमुख, सरपंच श्रीराम बावनथडे यांनी घटनास्थळी भेट दिली.