क्षुल्लक कारणावरून दुकानदारास मारहाण, पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 18:35 IST2018-09-28T18:34:41+5:302018-09-28T18:35:11+5:30

भांडुपच्या जयशंकर नगर परिसरात ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली आहे. या परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे हे गस्तीवर असताना त्यांची गाडी वळविण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे त्यांनी गाडीबाहेर उतरून दुचाकीमालक मालक संजय शुक्ला यांना दुकानाबाहेर बोलावून घेतलं आणि त्याच्या कानशिलात लगावल्या.

Custody capturing the shopkeeper from trivial cause, the police officer's dadagiri CCTV footage | क्षुल्लक कारणावरून दुकानदारास मारहाण, पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी सीसीटीव्हीत कैद

क्षुल्लक कारणावरून दुकानदारास मारहाण, पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी सीसीटीव्हीत कैद

मुंबई - भांडुप येथे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी कायदा हातात घेऊन दादागिरी केली आहे. गस्त घालत असताना पोलिसांच्या गाडीस वळवताना दुकानदाराच्या दुचाकीमुळे जागा न मिळाल्याने संतापलेल्या रमेश खडे यांनी चक्क दुकानदार संजय शुक्ला यांच्या कानशिलात लगवल्या. याप्रकरणी दुकानदाराने पोलीस उपायुक्तांना तक्रार दाखल केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

भांडुपच्या जयशंकर नगर परिसरात ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली आहे. या परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे हे गस्तीवर असताना त्यांची गाडी वळविण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे त्यांनी गाडीबाहेर उतरून दुचाकीमालक मालक संजय शुक्ला यांना दुकानाबाहेर बोलावून घेतलं आणि त्याच्या कानशिलात लगावल्या.या घटनेसंदर्भात पीडित संजय शक्ला यांनी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. संजय शुक्ला यांनी पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली म्हणून त्याच्यावर हात उचलला असल्याचा खुलासा खाड़े यांनी केला आहे.

Web Title: Custody capturing the shopkeeper from trivial cause, the police officer's dadagiri CCTV footage