केमिकल्स कंपनी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 14:20 IST2019-09-01T14:11:23+5:302019-09-01T14:20:44+5:30
शिरपुर शहर पोलीस सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केमिकल्स कंपनी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाङी येथील केमिकल्स कंपनीतील स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाविरोधात शिरपुर शहर पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी रुमती केमिसिंथ (केमिकल्स) कंपनीत झालेल्या स्फोटच्या घटनेत १३ जणांचा मुत्यु तर ७२ जण जखमी झाले होते. मृतकांमधील एकाची ओळख पटली नव्हती. मात्र, चौकशीनतंर तो मृतदेह सुनील पावरा रा.चादंसुर्या यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कंपनीतील कामगार गब्बरसिंग पावरा यांनी फिर्याद दिली आहे. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये ४० ते ५० कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्यावेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
धुळे - केमिकल्स कंपनी स्फोटप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) September 1, 2019