प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:09 IST2021-11-23T21:08:51+5:302021-11-23T21:09:42+5:30
Sexual Abuse : प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची तर तिचा प्रियकर त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळ
कल्याणः एकिकडे कल्याण डोंबिवलीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कल्याण पुर्वेत एका प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने विकृतीचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची तर तिचा प्रियकर त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
14 वर्षीय मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. या आरोपी तरुणीने प्रियकराला पिडीत मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. तीचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सुरुच होता. आरोपी तरुणीने पिडीत मुलाच्या बहिणीला प्रियकराबरोबर आपल्यासोबत शय्या कर असेही सांगितले होते. याप्रकरणी दोघा पिडीतांनी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. आरोपी प्रेयसी आणि पिडीत बहिण भाऊ जवळचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत प्रेयसी आणि प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.