रडत रडत आईने गाठलं पोलीस ठाणं, चाकूचा धाक दाखवत मुलीवर केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:36 IST2022-02-11T19:35:41+5:302022-02-11T19:36:38+5:30
Gangrape Case : आज पुन्हा आणखी एक अल्पवयीन मुलगी बलात्काराच्या घटनेची बळी ठरली आहे.

रडत रडत आईने गाठलं पोलीस ठाणं, चाकूचा धाक दाखवत मुलीवर केला गँगरेप
चुरू : चुरूच्या बीदासरमध्ये बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली होती, त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याचवेळी आज पुन्हा आणखी एक अल्पवयीन मुलगी बलात्काराच्या घटनेची बळी ठरली आहे.
डीएसपी रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की, गुरुवारी बालेरा गावातील एका महिलेने बीदासर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे की, माझी 14 वर्षांची मुलगी घरी एकटी होती. यादरम्यान हरिपुरा लोसल येथील रहिवासी असलेले दोन युवक दुचाकीवरून आले आणि दोन्ही तरुणांनी घरातून एकट्या राहणाऱ्या मुलीला फूस लावून अज्ञातस्थळी नेले. यानंतर बलात्काराची घटना घडवून आणली.
पीडितेच्या आईच्या अहवालानुसार, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध POCSO आणि IPC च्या कडक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास डीएसपी रामप्रताप बिश्नोई यांनी सुरू केला आहे.