गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्याला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:53 IST2019-03-16T16:52:25+5:302019-03-16T16:53:26+5:30
बोलण्यात गुंतवून त्यांना लुटल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला.

गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्याला लुटले
ठळक मुद्देरायगडचे रहिवासी असलेले सुनील कृष्णगोपाल टावरी (५५) हे शेतकरी आहेत.मुलीचे अपहरण झाल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले व त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.
मुंबई - अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून गुन्हे शाखा तपास करीत आहे, असे सांगत लुटारूंनी शेतकऱ्याला अडविले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांना लुटल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला.
रायगडचे रहिवासी असलेले सुनील कृष्णगोपाल टावरी (५५) हे शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा डॉक्टर असून तो मालाडमध्ये राहतो. ते मुलाकडे आले असताना, बुधवारी रेल्वे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी ते मालाड स्थानकात गेले. तेथून घरी परतत असताना, आनंद रोड परिसरात त्यांना काही जणांनी अडविले. पुढे, मुलीचे अपहरण झाल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले व त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.