निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 21:19 IST2021-12-07T21:18:43+5:302021-12-07T21:19:16+5:30
Murder Case : पोलीस घटनास्थळी पोहोचले असता २६ वर्षीय रवी राय हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. ते मुलाचे वडील होते.

निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्...
राजधानी दिल्लीतील बाह्य उत्तर जिल्ह्यातील भालवा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका निर्दयी पित्याने नशेत आपल्या ३ महिन्यांच्या मुलाला भिंतीवर आपटले. त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ डिसेंबरची आहे. ३ डिसेंबरच्या रात्री, मंगल बाजार रोडवरील समता विहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलाची हत्या केल्याचा पीसीआर कॉल पोलिसांना आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता २६ वर्षीय रवी राय हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. ते मुलाचे वडील होते. त्यानंतर पोलिसांनी ३ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. मुलाचे डोके पूर्णपणे फुटले होते.
आई-वडिलांचे भांडण आणि मुलाचा मृत्यू!
याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता पती-पत्नी गेल्या एक महिन्यापासून परिसरात भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले. दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. पती अनेकदा दारूच्या नशेत घरी यायचा, असेही शेजाऱ्यांकडून समजले.
मुलाच्या संगोपनावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी याच भांडणामुळे ती महिला ओरडत घराबाहेर आली आणि म्हणाली की, माझ्या मुलाला मारले आहे, माझ्या मुलाला मारले आहे. आरोपी रवी राय याला अटक करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.