CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू

By पूनम अपराज | Updated: January 29, 2021 17:58 IST2021-01-29T17:57:54+5:302021-01-29T17:58:59+5:30

Firing : शुक्रवारी बस्तर  जिल्ह्यातील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली.

CRPF jawans indiscriminately fire on colleagues; Death of one | CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू

CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू

ठळक मुद्देया घटनेत गोळीबार करणाऱ्या जवानासह दोनजण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर जवानाने स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली.

छत्तीसगडमध्ये एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी बस्तर  जिल्ह्यातील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली.

पोलीस निरीक्षक वेश्या अड्डयावर आढळला ग्राहक म्हणून अन् छापेमारीत झाली अटक  



या घटनेत गोळीबार करणाऱ्या जवानासह दोनजण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर जवानाने स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या जवानाने गोळीबार केला, तो मानसिक आजारी होता. आयसोलेशन वार्डमध्ये तो दाखल होता. तेथे त्याने अचानक आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेची पोलीस चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: CRPF jawans indiscriminately fire on colleagues; Death of one