CRPF jawan died after accidently shot from rifle | अंबानींच्या घराजवळील घटना; रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू

अंबानींच्या घराजवळील घटना; रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू

ठळक मुद्दे देवदन रामभाई बकोत्रा (३०) असे या जवानाचे नाव असून तो मूळचा गुजरात येथील आहे. सीआरपीएफ जवान बकोत्रा यांच्या रायफलमधून चुकून गोळी फायर होऊन ते जखमी झाले.प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील ॲन्टेलिया निवासस्थानाजवळ हा सीआरपीएफ जवान पेट्रोलिंग करत होता असताना ही दुर्दैवी घटना घडली

मुंबई - काल सायंकाळी अल्टामाउंट रोडवरून नवरंग सोसायटीकडे जाणाऱ्या पाटणवाला रोडवर सीआरपीएफच्या जवानाचा रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने मृत्यू झाला आहे.  देवदन रामभाई बकोत्रा (३०) असे या जवानाचे नाव असून तो मूळचा गुजरात येथील आहे. यासंदर्भात गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील ॲन्टेलिया निवासस्थानाजवळ हा सीआरपीएफ जवान पेट्रोलिंग करत होता असताना ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त राजीव जैन यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

सीआरपीएफ जवान बकोत्रा यांच्या रायफलमधून चुकून गोळी फायर होऊन ते जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत गावदेवी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली. 

Web Title: CRPF jawan died after accidently shot from rifle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.