अमानवतेची हद्द पार! कुत्रा भुंकला म्हणून संतापलेल्या तरुणाने चाकूने कापले, आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:57 IST2022-03-15T20:56:31+5:302022-03-15T20:57:37+5:30
Inhumanity Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला मारल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता आरोपीची चौकशी सुरू आहे.

अमानवतेची हद्द पार! कुत्रा भुंकला म्हणून संतापलेल्या तरुणाने चाकूने कापले, आता...
नवी दिल्ली - दिल्लीतील कल्याणपुरी भागात एका तरुणाने अमानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. रस्त्यावरील भटक्या कुत्र्याच्या भुंकण्याचा त्याला इतका राग आला की त्याने कुत्र्याला चाकूने भोसकले. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला मारल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता आरोपीची चौकशी सुरू आहे.
आरोपीने चौकशीत सांगितले की, येताना रस्त्यावरील कुत्रा अनेकदा भुंकत असे. हे पाहून तो खूप अस्वस्थ झाला आणि एके दिवशी कुत्रा पुन्हा भुंकला तेव्हा रागाच्या भरात त्याचा संयम सुटला आणि त्याने कुत्र्याला चाकूने भोसकले.
A stray dog was stabbed to death by a man in Delhi's Kalyanpuri area. The accused has told the police that the dog used to bark often due to which he committed this incident after getting irritated. Police registered a case under sections of cruelty on animals, police said
— ANI (@ANI) March 15, 2022
नोएडामध्येही असाच प्रकार घडला आहे
याच्या काही दिवसांपूर्वी नोएडामध्येही एका व्यक्तीने बेसबॉलच्या काठीने कुत्र्याला बेदम मारहाण केली होती. या आरोपात दिल्ली पोलीस हवालदार विनोद कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हापूरचा रहिवासी असून तो सध्या नोएडातील सेक्टर 44 मध्ये राहत होता. त्यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा कुत्र्याला घाबरत असे कारण जेव्हा तो तेथून बाहेर जायचा तेव्हा तो भुंकायचा. यानंतर स्थानिक लोक आणि कॉन्स्टेबलमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर प्राणी क्रूरतेच्या कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या
दिल्ली एनसीआर भागात भटक्या प्राण्यांची समस्या वाढत आहे. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांचाही त्रास झाला आहे, मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा हे भटके प्राणी अपघाताचे कारणही ठरतात.