शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
2
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
3
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
4
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
5
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
6
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
7
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
8
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
9
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
10
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
11
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
12
मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत
13
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
14
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
15
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
16
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?
17
लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
18
मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित
19
हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय
20
जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून, जामिनावर होता बाहेर, दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 10:53 PM

Crime News: म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली.

नाशिक - म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली. रविवारी (दि.२१) रात्री हा खून उघडकीस आला. घटनास्थळावर पोलिसांना एक ॲक्टीवा दुचाकी आढळून आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण काकड हा पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात दहा ते बारा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दिवाळीसाठी प्रवीण हा जामीनावर कारागृहातून बाहेर आला होता.

म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभुमीच्यापुढे असलेल्या एका निर्जन मोकळ्या भुखंडावर प्रवीण काकडचा मृतदेह रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गवतामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करत तत्काळ ओळख पटवून जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. रात्री उशीरापर्यंत प्रवीण याच्या मारेकऱ्याचा पोलिसांना शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ओली पार्टी करताना झाला असावा हल्लाज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह गवतामध्ये आढळून आला तेथेच पोलिसांना मद्याच्या काही रिकाम्या बाटल्या तसेच मोपेड काळ्या रंगाची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून सुमारे दोन ते तीन संशयितांनी मिळून प्रवीणचा खून केला असल्याची श्यक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही दुचाकी प्रवीणने आणली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक