Coronavirus : कोरोना कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 20:51 IST2021-04-04T20:50:44+5:302021-04-04T20:51:51+5:30
Crime Case : या शिवाय पालिकेने दोन हॉटेल ना प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

Coronavirus : कोरोना कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा
मीरारोड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पालिका पथकाशी भांडण करून अडथळा आणणाऱ्या मीरारोडच्या शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया या दोघांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता आयुक्त दिलीप ढोले यांनी कारवाईसाठी पथके तैनात केली आहेत . त्या अनुषंगाने पालिका व पोलिसांनी बेजबादार लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. पालिकेने पथके नेमली असून शनिवारी मीरारोड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया यांच्यावर कारवाई करते वेळी त्यांनी भांडण करून अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या शिवाय पालिकेने दोन हॉटेल ना प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या १७० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने शनिवारी १ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे .