Crime: काका, आजोबा अन् वडीलही करायचे अत्याचार; सुन्न करणारी ‘आपबिती’ महाविद्यालयातील समुपदेशातून फुटली धक्कादायक घटनेला वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:36 IST2022-11-18T06:35:24+5:302022-11-18T06:36:44+5:30
Crime: अतिशय हुशार असलेल्या आणि सध्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीने महाविद्यालयातील समुपदेशनाच्या कार्यक्रमात मौन सोडल्याने घरातीलच गुन्हेगार समोर आले आहेत.

Crime: काका, आजोबा अन् वडीलही करायचे अत्याचार; सुन्न करणारी ‘आपबिती’ महाविद्यालयातील समुपदेशातून फुटली धक्कादायक घटनेला वाचा
पुणे : अतिशय हुशार असलेल्या आणि सध्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीने महाविद्यालयातील समुपदेशनाच्या कार्यक्रमात मौन सोडल्याने घरातीलच गुन्हेगार समोर आले आहेत. आपल्यावर सहा वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराची माहिती यावेळी दिली. उत्तर प्रदेशातील मूळ गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करून तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी वारंवार विनयभंग केला. ही बाब तिने वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. मात्र, २०१८ मध्ये पुण्यात आल्यावर वडिलांनीही तिच्यावर चार वर्षे अत्याचार केला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्या ४९ वर्षांच्या नराधम बापाला अटक केली आहे. हा प्रकार ऐकून पोलिसही सुन्न झाले. तिच्या आईने याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.
पुतणीवर बलात्कार
दुसऱ्या एका घटनेत अटकेत झालेल्या आई- वडिलांना येरवडा कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने लॉजमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काका रोहित गौर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.