पुण्यात सुरक्षा रक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:56 IST2018-06-12T13:56:58+5:302018-06-12T13:56:58+5:30
पुण्यात एका सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पौड रोडवरील चांदणी चौकातील ही घटना आहे.
_201707279.jpg)
पुण्यात सुरक्षा रक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
पुणे - पुण्यात एका सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पौड रोडवरील चांदणी चौकातील ही घटना आहे. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (वय 63 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. ते वारजे माळवाडी येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, जीवनलाल मिस्तिकल हे चांदणी चौकाजवळ असलेल्या केसी पीएल कंपनीत कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते रात्रीच्या वेळेस आपले कामावर गेले होते. यादरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तेथील स्थानिकांना आढळून आले.
यानंतर स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेला. दरम्यान, जीवनलाल मिस्तिकल यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.