पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:29 IST2019-08-06T16:28:28+5:302019-08-06T16:29:35+5:30
पिस्तुल दाखवत ''तुझी विकेटच काढतो'' असे म्हणून हवेत एक गोळी तर दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला..

पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : पवनानगर येथे हवेत गोळीबार करत एक जणांवर बंदूक रोखत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीप बाबुलाल भुतडा (वय ४३, रा. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन खंडू अशोक कालेकर, अनिकेत अशोक कालेकर व अभिषेक काशिनाथ साबळे (सर्व रा. पवनागर, ता.मावळ, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेकर यांनी संगनमत करून पवनानगर येथील जितेश ओमप्रकाश यांच्याकडे तीन हजार रुपये मागितले. याबाबत भुतडा यांनी विचारणा केली असता अनिकेत अशोक कालेकर तसेच खंडू अशोक कालेकर याने पिस्तुल दाखवत तुझी विकेटच काढतो असे म्हणून हवेत एक गोळी तर दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत.