शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पिंपळे गुरव येथे रस्त्याचे काम बंद पाडल्याने सात जणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 7:06 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे.

पिंपरी : रस्ता विकसित करण्याचे काम सुरु असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासोबत वाद घालत रस्त्याचे काम बंद पाडले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विजय चंद्रकांत कांबळे (वय ४५) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रभावती सुदाम जाधव (वय ६३), शिला अशोक आंबेकर (वय ६५), मिना पांडुरंग दळवी (वय ४५) अंजुम रशिद शेख (वय ४०), पांडुरंग बाबुराव दळवी (वय ५३), अभय अशोक आंबेकर (वय २८) अक्षय पांडुरंग दळवी (वय २३ सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपींनी कामाच्या ठिकाणी जाऊन अभियंत्यासोबत वाद घातला. तसेच रस्त्याचे सुरु असलेले काम बंद पाडले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून सांगवी पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस