शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

धक्कादायक! आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; ग्रामस्थांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:31 IST

Crime News : गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अफेअरबाबत समजताच 2 तरुण मुलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला भयंकर शिक्षा दिली आहे. केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, 

महिलेच्या 22 वर्षीय कृष्ण दास आणि 20 वर्षीय कौशिक दास या दोन मुलांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला. आईच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलांना माहिती झालं होतं. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गावातील लोकांनी या महिलेसह तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचाही संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आता मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावातील महिलांनी स्वतःच या मुलांच्या आईला शिक्षा दिली आहे. 

महिलांनी तिला केसाला पकडून रस्त्यावर ओढत आणलं. यानंतर तिला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी माहिती देताना आरामबागचे एसडीपीओ अभिषेक मंडल यांनी महिलेला मारहाण केली गेली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या दोन मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यावर हे स्प्ष्ट होईल असं म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी एक बाजू समोर येत आहे ती अशी की, कृष्णादास याचं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी पिया हिच्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली होती. 

कृष्णा दासने यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कौशकला हे माहिती झालं तेव्हा तो हे दुःख सहन करू शकला नाही आणि त्यानेही गळफास घेतला. तर दुसरीकडे कृष्णा दासच्या पत्नीने पती आणि दिराच्या हत्येचा आरोप आपल्या सासूवर केला आहे. सासूनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून या दोघांची हत्या केली आहे असं म्हटलं आहे. आपल्याला खोट्या आरोपात फसवलं जात असल्याचं या मुलांच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं सुनेसोबत भांडण झालं होतं, याच कारणामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिसDeathमृत्यू