Crime News: तरुणाने OYO वरून बुक केला हॉटेलमधील रूम, बेडखाली सापडला महिलेचा मृतदेह, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 08:46 IST2022-09-21T08:36:06+5:302022-09-21T08:46:10+5:30

Crime News: एका लॉजमध्ये एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा लॉज आदित्यपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आरआयटी येथे असून, त्याचं नाव शुभेक्षा लॉज आहे. या लॉजमधील खोली क्रमांक १०१ मधून महिलेचा मृतदेह सापडला आहे.  

Crime News: Young man booked a hotel room from OYO, woman's body was found under the bed, then... | Crime News: तरुणाने OYO वरून बुक केला हॉटेलमधील रूम, बेडखाली सापडला महिलेचा मृतदेह, त्यानंतर...

Crime News: तरुणाने OYO वरून बुक केला हॉटेलमधील रूम, बेडखाली सापडला महिलेचा मृतदेह, त्यानंतर...

रांची - झारखंडमधील जमशेदपूरमध्ये एका लॉजमध्ये एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा लॉज आदित्यपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आरआयटी येथे असून, त्याचं नाव शुभेक्षा लॉज आहे. या लॉजमधील खोली क्रमांक १०१ मधून महिलेचा मृतदेह सापडला आहे.  

याबाबतची माहिती मिळताच आदित्यपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन या घटनेच्या तपासास सुरुवात केली. मृत महिला ही जमशेदपूरमधील गालूडीह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेचं नाव कांती देवी आहे, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

हा लॉज ओयोकडून चालवण्यात येतो. त्यामध्ये बाहेरून प्रेमी युगुलांना येण्याची परवानगी आहे. सदर महिला कोलकाता येथील कुठल्यातरी युवकासोबत येथे आली होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सदर तरुण तिथून फरार झाला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे.

तसेच याबाबत विचारणा केली असता हॉटेलच्या मॅनेजरनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी सांगितले की, हे दोघेही रूम बुक करण्यासाठी दुपारी आले होते. त्यानंतर तरुण जेवण आणण्यासाठी बाहेर पडला. मात्र तो परत माघारी आला नाही. तो हॉटेलमधून फरार झाला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच फरार तरुणाचा शोध घेत आहेत.  

Web Title: Crime News: Young man booked a hotel room from OYO, woman's body was found under the bed, then...