धक्कादायक! पत्नीने घरमालकासोबत संबंध ठेवण्यास दिला नकार, पती घटस्फोट देऊन झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 13:07 IST2021-11-27T12:50:30+5:302021-11-27T13:07:08+5:30
UP Crime News : पीडितेच्या आरोपांनुसार, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून तिच्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव टाकत होता आणि यासाठी तो तिला अनेकदा मारहाणही करत होता.

धक्कादायक! पत्नीने घरमालकासोबत संबंध ठेवण्यास दिला नकार, पती घटस्फोट देऊन झाला फरार
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत लाजिरवाणा प्रकार तर केलाच, त्यानंतर तिला तीन तलाकही दिला. या महिलेचं तीन वर्षाआधी लिसाडी गेट येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. पत्नीच्या आरोपांनुसार, आरोपी पती घराचं भाडं माफ करण्यासाठी तिच्यावर घरमालकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.
भाड्याच्या बदल्यात पत्नी
पीडितेच्या आरोपांनुसार, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून तिच्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव टाकत होता आणि यासाठी तो तिला अनेकदा मारहाणही करत होता. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती तिला म्हणाला होता की, तिने घरमालकासोबत संबंध ठेवावे, जेणेकरून घरमालक घराच्या भाड्याने थकीत पैसे माफ करेल. यानंतर पीडितेने जेव्हा यास नकार दिला तेव्हा तो तीन तलाक देऊन फरार झाला.
पीडितेची पोलिसात तक्रार
पीडिता यानंतर पोलिसांकडे गेली आणि पतीविरोधात तिने तक्रार दिली. पीडितेला दोन मुलं आहेत तर एका मुलीचा आधीच मृत्यू झाला आहे. आरोपीला नशेची लत आहे आणि त्यामुळे त्याने घरातील सगळं साहित्यही विकलं. पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून आपली चौकशी सुरू केली आहे. पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. पीडितेने सासरच्या लोकांवरही मारहाण केल्याचा आरोप लावला आहे.