शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

Crime News: नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 1:21 PM

Crime News: सहलीला गेल्यानंतर दोघा पुरुष नातेवाईकांबरोबर नाचल्याचा राग आणि डोक्यातील संशयाचे भूत यातून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय सावकाराने आपल्या पत्नीची हत्याच केली.

बंगळुरू : सहलीला गेल्यानंतर दोघा पुरुष नातेवाईकांबरोबर नाचल्याचा राग आणि डोक्यातील संशयाचे भूत यातून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय सावकाराने आपल्या पत्नीची हत्याच केली. हत्येनंतर तो फरार झाला. बंगळुरूच्या बी. आर. कांताराजू असे आरोपीचे नाव आहे. आपल्याच दोन नातेवाईकांशी पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा त्याला संशय होता. हे दांपत्य काही नातेवाईकांसह चिक्कबंगळुरू आणि आसपासच्या भागांत तीन दिवसांच्या सहलीला गेले होते. तिथे गाण्याच्या तालावर सर्वच जण नाचत होते. कांताराजूची पत्नी रूपा हीदेखील त्यात सहभागी झाली. ज्या दोघांशी तिचे संबंध असल्याची शंका त्याला होती, तेही त्यावेळी नाचत होते. त्यामुळे तो मनातून खूपच संतापला.  

संशय होतासहलीनंतर दाम्पत्य घरी आले आणि कांताराजूने पत्नीशी भांडायला सुरुवात केली. ‘‘तू त्यांच्याबरोबर का नाचत होतीस, त्यांचे आणि तुझे काय संबंध आहेत’’, असे सवाल त्याने केल्याने भांडण वाढले. त्याच रागात त्याने पत्नीच्या पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसला. पत्नी रूपा तिथेच कोसळली. तिच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होते.  पण कांताराजूने तिला डॉक्टरांकडे न नेता वा उपचार न करता तेथून पळ काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक