Crime News: स्थळ आलं, लग्न झालं, पण मधुचंद्राच्या रात्री दिसलं असं काही, पाहून पतीला बसला धक्का, पत्नीला थेट माहेरी हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:33 IST2022-06-08T18:33:04+5:302022-06-08T18:33:42+5:30
Crime News: एका तरुणाचं लग्न त्याच्या नातेवाईकांनी एका तरुणीसोबत ठरवलं होतं. वरानं सांगितलं की, लग्न ठरल्याने तो खूश होता. तसेच होणाऱ्या पत्नीसोबत लग्नापूर्वी दररोज बोलायचा. लग्नाच्या दिवशी थाटामाटात तो पत्नीला घरी घेऊन आला. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं.

Crime News: स्थळ आलं, लग्न झालं, पण मधुचंद्राच्या रात्री दिसलं असं काही, पाहून पतीला बसला धक्का, पत्नीला थेट माहेरी हाकलले
भोपाळ - मध्य प्रदेशमधील शिवपुरू जिल्ह्यातील बदरवास येथे राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न त्याच्या नातेवाईकांनी अशोकनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरवलं होतं. वरानं सांगितलं की, लग्न ठरल्याने तो खूश होता. तसेच होणाऱ्या पत्नीसोबत लग्नापूर्वी दररोज बोलायचा. लग्नाच्या दिवशी थाटामाटात तो पत्नीला घरी घेऊन आला. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं. मधुचंद्राच्या रात्री त्याने पत्नीच्या पोटावर सात ते आठ टाके घातलेले होते. पीडित पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीने लग्नापूर्वी तीन महिने आधी तिने गर्भपात करून घेतला होता, ही बाब त्याला मधुचंद्राच्या रात्री समजली.
पतीने सांगितले की, ही बाब आपल्याला कुणीही सांगितली नव्हती. जर असं समजलं असतं तर त्याने हे लग्नच केलं नसतं. त्यानंतर लग्नाच्या दहा दिवसांच्या आतच पतीने पत्नीला माहेरी अशोकनगर येथे पाठवून दिले. तसेच तिला परत आणण्यासाठी कधीही सासरी येणार नाही, असंही त्याने तिला सांगितलं.
पीडित पतीने सांगितले की, त्याची पत्नी त्याला छळाच्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पतीने प्रसंगावधान दाखवले आणि कोर्टातही पत्नीने केलेल्या आरोपांविरोधात केस लढत राहिला. यादरम्यान, त्याने आरटीआयची मदत घेतली. तेव्हा त्याला समजले की, त्याच्या पत्नीने अशोकनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये गर्भपात करून घेतला होता. त्याच्या पत्नीने पोटात असलेल्या तीन महिन्यांच्या भ्रुणाचा लग्नाच्या आधी तीन महिने आधी गर्भपात करून घेतला होता, अशी माहिती आरटीआयमधून समजली. त्याने याचे पुरावे, कोर्टात सादर केले आहेत.
दरम्यान, माहेरी गेल्यानंतर पत्नीने अशोरनगरमध्ये त्याच्याविरोधात पोटगीसाठी दावा दाखल केला आहे. दरम्यान, जेव्हा जेव्हा तो कोर्टात तारखेला जातो तेव्हा आपल्याला लपूनछपून जावं लागतं. कारण पत्नीने आपल्याला अशोकनगमध्ये अनेकदा मारहाण केल्याचा आरोपही या तरुणाने केला.