भयंकर! पतीने फोनवर कोणाशी बोलतेस? विचारलं म्हणून पत्नीने केली आत्महत्या, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:08 IST2021-10-02T13:01:29+5:302021-10-02T13:08:27+5:30
Crime News : पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने विष घेऊन आपलं जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

भयंकर! पतीने फोनवर कोणाशी बोलतेस? विचारलं म्हणून पत्नीने केली आत्महत्या, घटनेने खळबळ
नवी दिल्ली - पती- पत्नीमध्ये अनेकदा कौटुंबिक कारणांवरून वाद होत असतात. काही वेळा हे वाद विकोपाला देखील जातात अशीच एक घटना आता घडली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने विष घेऊन आपलं जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यात एका 32 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे.
महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैजनाथच्या ग्रामपंचायत सेहलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विनिता असं 32 वर्षीय महिलेचं नाव असून तिने विष पिऊन आत्महत्या केली आहे. महिलेचा पती कारपेंटर आहे. पती अर्जुनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री विनिता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. याच दरम्यान मी विनिताला विचारले की तू फोनवर कोणाशी बोलत होती. विचारल्यावर तिने थेट विष पिऊन आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये विनिताने स्वतःच्या इच्छेनुसार विष घेतल्याचं लिहिलं
पोलिसांनी विनिताच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडल्याचं सांगितलं आहे. सुसाईड नोटमध्ये विनिताने स्वतःच्या इच्छेनुसार विष घेतल्याचं लिहिलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधीही विनिताच्या पतीने तिचा मोबाईल बऱ्याचवेळा काढून घेतला होता. पोलिसांनी मृत विनिताची बहीण ममताचीही चौकशी केली आहे. पोलीस प्रभारी ओम प्रकाश ठाकूर यांनीपोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.