पश्चिम बंगाल हादरलं! TMC नेत्यासह 3 जणांची हत्या; हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:38 IST2022-07-07T12:28:48+5:302022-07-07T12:38:48+5:30

Crime News : तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Crime News west bengal three inlcuding a tmc leader shot dead in south 24 pargana | पश्चिम बंगाल हादरलं! TMC नेत्यासह 3 जणांची हत्या; हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार

पश्चिम बंगाल हादरलं! TMC नेत्यासह 3 जणांची हत्या; हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. पश्चिम बंगाल पुन्हा एकदा हादरलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी बाईकवरून जाणारे टीएमसीचे नेते स्वपन माझी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर अंदाधुंद गोळाबार गेला, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील कॅनिंगमध्ये टीएमसी नेते स्वपन माझी हे आपल्या दोन साथीदारांसह बाईकवरून जात होते. तितक्यात काही लोक तिथे आले. त्यांनी बाईक थांबवली आणि तिघांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

स्वपन माझी हे टीएमसी पंचायत सदस्य होते. त्यांची गोपाळनगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर त्यांच्या साथीदारांवर देखील गोळ्या झाडण्यात आल्या आहे. सकाळी साधारण नऊच्या वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. बाजारातून परत येत असताना गर्दीच्या ठिकाणी हल्लेखोऱ्यांनी अचानक नेत्यावर हल्ला केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: Crime News west bengal three inlcuding a tmc leader shot dead in south 24 pargana