Crime News Wardha: उधारीच्या पैशातून युवकाचा खून; इतवारा परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 22:55 IST2021-10-18T22:54:44+5:302021-10-18T22:55:34+5:30
आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी निलेश वालमांढरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दारूविक्री सह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मृतक हा देखील त्याच पार्शवभूमीचा असल्याचे समजते.

Crime News Wardha: उधारीच्या पैशातून युवकाचा खून; इतवारा परिसरातील घटना
वर्धा : उसणवारीने दिलेले पैसे न दिल्याने युवकाची चाकू ने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना इत्वारा बाजार परिसरातील मच्छी मार्केट परिसरात रात्री 8.25 वाजता घडली. शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून चाकू जप्त केल्याची माहिती दिली.
रुपेश खिल्लारे रा. इतवारा असे मृतकाचे नाव आहे.
मृतक रुपेश याने आरोपी निलेश वालमांढरे याच्याकडून उसणवारीने पैसे घेतले होते. मात्र पैशाची परतफेड न केल्याने आरोपी निलेश याने मृतक रुपेश ला पैसाची मागणी केली. यातून दोघात वाद झाला आणि निलेश ने रुपेश च्या पोटावर चाकूने सपासप वार करून हत्या केली. आरोपी निलेश ला शहर पोलिसाने अटक केल्याची विश्व्सनीय माहिती असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा
आरोपी निलेश वालमांढरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दारूविक्री सह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मृतक हा देखील त्याच पार्शवभूमीचा असल्याचे समजते.