शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Crime News: शासकीय योजनांचे आमिष दाखवून कागदपत्रे घेत वाहन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश , ३३ दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 6:28 PM

Crime News: कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरीकांच्या कागदपत्रांची फसवणूक करीत त्यावर बँक अथवा फायनान्स कंपनी कडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के किमतीला विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला

- नितिन पंडीतभिवंडी - भिवंडी शहरातील गरीब व गरजु नागरीकांना हेरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आधारकार्ड पॅनकार्ड या कागदपत्रांची मागणी करून तसेच काहींना कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरीकांच्या कागदपत्रांची फसवणूक करीत त्यावर बँक अथवा फायनान्स कंपनी कडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के किमतीला विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून यामध्ये तब्बल ३२ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करीत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेलया यश मिळाले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी भिवंडी गुन्हे शाखेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी असद समद बेग यास काही जणांनी कागदपत्रांच्या मोबदल्यात दोन फायनान्स कंपनी मधून कर्जावर तीन दुचाकी काढल्याचे त्याच्याकडे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी आले असता समजले त्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना त्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे हे समांतर तपास करीत असताना माहितीच्या आधारे शाह मोहम्मद आसिफ मोहम्मद आझम उर्फ बावटा यास ताब्यात घेत त्याच्या कडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या शोरूम मधून कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करीत अनेक दुचाकी कमी किमतीत विक्री केल्याचे आढळले.त्याचे साथीदार अल्ताफ लतीफ शेख ,शफिक अब्दुल लतीफ अन्सारी ,अरबाज आसिफ मोमीन उर्फ देवा या चार जणांच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून तब्बल ३३ दुचाकी ६ मोबाईल असा एकूण ३२ लाख ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो निरी सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पो उप निरी शरद बरकडे,रमेश शिंगे,सपो उप निरी हनुमंत वाघमारे,रामसिंग चव्हाण,लक्ष्मण फालक ,पो हवा सुनील साळुंके, रामचंद्र जाधव ,मंगेश शिर्के,सचिन जाधव,साबीर शेख,रंगनाथ पाटील,भावेश घरत, रवींद्र घुगे,नरसिंह क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपींनी भिवंडी सह मालेगाव या भागात विक्री केलेल्या वाहनांचा शोध घेत आरोपींना गजाआड केले आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी