Crime News: गुप्तधनाच्या लासेपोटी काका-काकीने दिला चिमुकल्याचा बळी, तीन तुकडे केले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 22:51 IST2022-03-14T22:50:36+5:302022-03-14T22:51:17+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात माणुसकी आणि नात्यांना कलंक लावणारी घटना घडली आहे. अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या माध्यमातून घरात दडवलेला खजिना मिळवण्याच्या लालसेमुळे हैवान बनलेल्या दाम्पत्याने आपल्याच नऊ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली.

Crime News: गुप्तधनाच्या लासेपोटी काका-काकीने दिला चिमुकल्याचा बळी, तीन तुकडे केले आणि...
लखनौ - उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात माणुसकी आणि नात्यांना कलंक लावणारी घटना घडली आहे. अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या माध्यमातून घरात दडवलेला खजिना मिळवण्याच्या लालसेमुळे हैवान बनलेल्या दाम्पत्याने आपल्याच नऊ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी या चिमुकल्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका डब्यात बंद करून ठेवले. दरम्यान, दुर्गंधी पसरल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सोमवारी पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याला अटक केली.
चित्रकुट येथील सदर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राघवपुरी मोहल्ल्यातील निवासी राम प्रयाग सिंह रैदास यांनी गेल्या ८ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे तक्रार देऊन त्यांचा ९ वर्षांचा मुलगा हरवल्याची सूचना दिली होती. कुटुंबीयांनी खूप शोधाशोध करूनही चार दिवसांनंतरही त्याची काही मिळाली नाही. दरम्यान, त्याच्या शेजारी असलेल्या काकाच्या घरातून दुर्गंध आल्यानंतर शोध घेतला असता. मुलाचा मृतदेह धान्याच्या डब्यात सापडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या भुल्लू वर्माकडे मुलाचं येणंजाणं होतं. दरम्यान, दिवाळीच्या दिवसात भूल्लू आणि त्याच्या पत्नीच्या स्वप्नात घरातील गुप्त खजिना आला. घरात तीन हांडे भरून गुप्तधन असून, ते मिळवण्यासाठी बालकाचा बळी दिल्यास तो खजिना मिळेल, असे दिसले. त्यानंतर त्या खजिन्यासाठी या दाम्पत्याने तंत्र-मंत्राची मदत घेत बालकाचा बली दिला. मात्र बालकाचा शोध सुरू झाल्याने ते आपली साधना पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी बालकाचा मृतदेह तुकडे करून धान्याच्या डब्यात भरून ठेवला. मात्र मृतदेहाला दुर्गंधी पसरल्याने प्रकरणाला वाचा फुटली.