शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

Crime News : धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करत मित्रानेच केला खून,भवानी पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 13:53 IST

हत्या करणाऱ्या मित्राला पोलिसांनी केली अटक..

पुणे : भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच मित्राने चाकूने वार करुन खुन केल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला असून मित्राला अटक केली आहे. सिद्धार्थ ऊर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (वय २८, रा. सोलापूर बाजार, वानवडी)असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अजय दादु खुडे (वय ३०, रा.कासेवाडी, भवानी पेठ) याचा खुन झाला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिद्धार्थ आणि अजय खुडे हे पूर्वी एकत्र राहत होते.  त्यावेळी २०१७ मध्ये अजय याची पत्नी बेपत्ता झाली होती. त्याच्यामागे सिद्धार्थ याचाच हात असल्याचा संशय अजय होता. त्यावरुन त्याने सिद्धार्थवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अजयविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही अजय आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. सिद्धार्थला धमकावत होता. अजय आपल्याला मारुन टाकेल अशी भीती सिद्धार्थला वाटत होती. त्यामुळे सिद्धार्थ याने गोड बोलून अजय याला बुधवारी रात्री कोंढव्यातील पार्थी मैदानाजवळ बोलावले. तेथे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजय याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खुन केला. गुरुवारी सकाळी नागरिक फिरायला गेले असताना त्यांना एका तरुणाचा मृतदेह पडलेला आढळून आला.  अजय खुडे याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस