Crime News : धक्कादायक घटना, मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 09:19 IST2022-04-10T09:19:25+5:302022-04-10T09:19:45+5:30
Crime News: मुलाला होत असलेली मारहाण बघून त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

Crime News : धक्कादायक घटना, मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू
मुंब्रा : मुलाला होत असलेली मारहाण बघून त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. डायघर गावातील रहिवासी समी खान याचे गुरुवारी सायंकाळी काही तरुणांशी भांडण झाले होते. त्या वैमनस्यातून काही तरुण शुक्रवारी पहाटे त्याच्या घरी गेले आणि त्याला घराबाहेर काढून मारहाण करू लागले. हे बघून त्याचे वडील अमीर त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तक्रारीवरून हानिफ, नन्हे आणि राहुल उर्फ इरफान या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून राहुलला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास शीळ-डायघर पोलीस करत आहेत.