Crime News: धक्कादायक! दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून पती पत्नीस मारहाण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 19:39 IST2022-04-30T19:38:48+5:302022-04-30T19:39:35+5:30

Crime News: दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी दुकानदार सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे.

Crime News: Shocking! Husband beats wife for asking to spit in front of shop | Crime News: धक्कादायक! दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून पती पत्नीस मारहाण   

Crime News: धक्कादायक! दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून पती पत्नीस मारहाण   

मीरारोड - दुकाना समोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी दुकानदार सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे.

मीरारोड च्या शांती नगर मध्ये राहणारे  विजय हिंगोराणी (२६) यांचा सेक्टर १० मध्ये कांदा बटाटा विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी रात्री विजय व पत्नी प्रिया हे दुकानात असताना दोन अनोळखी इसम दुकानासमोर थुंकल्याने विजयने माझ्या दुकानासमोर का थुंकलात म्हणून विचारणा केली. त्यावर दोघांनी मोठ्या आवाजात शिवीगाळ करत विजय व प्रिया ला धक्काबुक्की केली. तसेच कॉल करून आणखी दोघांना बोलावून घेतले.

त्या चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करत लथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने  विजय ला मारहाण सुरू केली.  प्रिया सोडविण्यासाठी आली असता तीला सुध्दा धक्काबुक्की करुन तीचे हातातील मोबाईल फोडला. विजय च्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी चौघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Crime News: Shocking! Husband beats wife for asking to spit in front of shop