Crime News: महिलांना व्हिडीओ कॉल करून त्रास देणाऱ्या बदलापुरातील पुष्पराजला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 11:09 IST2022-04-05T11:02:56+5:302022-04-05T11:09:21+5:30

Crime News: बदलापुरात एका दुकानदाराला महिलांनी दुकानात घुसून मारहाण केली. हा दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाइल नंबर घ्यायचा आणि नंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून त्रास द्यायचा, अशा तक्रारी आल्या होत्या. 

Crime News: Pushparaj in Badlapur beaten up for harassing women by making video calls | Crime News: महिलांना व्हिडीओ कॉल करून त्रास देणाऱ्या बदलापुरातील पुष्पराजला चोप

Crime News: महिलांना व्हिडीओ कॉल करून त्रास देणाऱ्या बदलापुरातील पुष्पराजला चोप

 बदलापूर : बदलापुरात एका दुकानदाराला महिलांनी दुकानात घुसून मारहाण केली. हा दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाइल नंबर घ्यायचा आणि नंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून त्रास द्यायचा, अशा तक्रारी आल्या होत्या. 
बदलापूर पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटलसमोर अनामिका नॉव्हेल्टी नावाचे स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी निमित्ताने घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा. त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून ताे त्रास द्यायचा, अशा काही तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराज याला दुकानात जाऊन चोप दिला तसेच माफी मागायला भाग पाडले. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Web Title: Crime News: Pushparaj in Badlapur beaten up for harassing women by making video calls