Crime News in Pune: साताऱ्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या आईचा पुण्यात खून; डोक्यात रॉड मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:44 AM2021-05-08T09:44:53+5:302021-05-08T09:45:41+5:30

Murder in Pune: विठ्ठल शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुण्याच्या भाजी मंडईजवळच त्यांच्या आईचे भंगार विक्रीचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या.

Crime News in Pune: Murder of Satara Assistant Police Inspector's mother in Pune; Hit the rod on the head | Crime News in Pune: साताऱ्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या आईचा पुण्यात खून; डोक्यात रॉड मारला

Crime News in Pune: साताऱ्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या आईचा पुण्यात खून; डोक्यात रॉड मारला

Next

पुणे : सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या विठ्ठल शेलार यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ ही पहाटे घटना घडली आहे. (Murder in Pune, warje Malwadi.)


शाबाई शेलार यांचा मुलगा विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळातच खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ४ दिवसात संचारबंदी असतानाही खुनाच्या ५ घटना घडल्या आहेत.

Web Title: Crime News in Pune: Murder of Satara Assistant Police Inspector's mother in Pune; Hit the rod on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.