आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:27 IST2025-06-13T13:27:28+5:302025-06-13T13:27:53+5:30

राजा रघुवंशी घटनेमुळे लोकांच्या मनात भीती असतानाच, आता असेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका आईने स्वतःच्या मुलीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

Crime News Our daughter is no less than Sonam! Expressing fear for her son-in-law's life, the mother reached the police station! | आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 

आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 

मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याची त्याच्याच पत्नीने, सोनम रघुवंशी हिने प्रियकराच्या मदतीने हनिमूनवर असताना हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. इंदूरच्या या घटनेमुळे लोकांच्या मनात भीती असतानाच, उत्तर प्रदेशातील शामली येथून असेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका आईने स्वतःच्या मुलीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिची मुलगी आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची म्हणजेच जावयाची हत्या करू शकते, अशी भीती तिला वाटत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनाही या महिलेचे बोलणे ऐकून धक्का बसला. या महिलेने तक्रार दाखल करताना सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न होऊन १२ वर्षे झाली आहेत, पण तिचे सासरच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले आहेत. तिच्या आईने पोलिसांना सांगितले की, "माझी मुलगी तिच्या प्रियकरासोबत मिळून माझ्या जावयाला राजा रघुवंशीसारखे मारून टाकेल."

मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या सासरच्या लोकांना कळल्यावर, त्यांनी तिला माहेरी आणले. हे प्रकरण शामलीच्या चौसाना चौकी भागातील अलीपूर गावातून समोर आले आहे.

प्रियकरासोबत पळून गेली आणि सासरी गोंधळ घातला!
आईने दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर ही मुलगी बुधवारी तिच्या प्रियकरासोबत तिच्या सासरच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी तिथे तिने घरात तोडफोड केली, आपल्या दीराला मारहाण केली आणि सासरच्या घरीच राहणार असे बोलू लागली. मात्र, जेव्हा तिच्या पतीने तिला घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा तिने आणखी गोंधळ घातला. या परिस्थितीमुळे तिचा पती आणि आई यांनी तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुलगी जावयासाठी धोकादायक!
आरोपी महिलेच्या पतीनेही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तर, मुलीच्या आईने म्हटले की, "आमची मुलगी सोनम रघुवंशीपेक्षा कमी नाही. ती आमच्या जावयाला मारू शकते. ती तिच्या प्रियकरासोबत मिळून जावयाला मारण्याचा कट रचू शकते. आम्हाला याचीच भीती वाटत आहे."

या सर्व आरोपानंतर आईने आपल्या मुलीविरुद्ध चौसाणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांना जामिनावर स्वाक्षरी करायला लावली आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Crime News Our daughter is no less than Sonam! Expressing fear for her son-in-law's life, the mother reached the police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.