धक्कादायक! एक कोटींच्या विमा पॉलिसीमध्ये लिव्ह-इन पार्टनर होता नॉमिनी; पैशाच्या लोभात त्याने प्रेयसीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:19 IST2025-01-18T14:17:29+5:302025-01-18T14:19:25+5:30
शुक्रवारी डिफेन्स एक्स्पो मैदानात रस्त्याच्या कडेला एका तरुणीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी लिव्ह-इन पार्टनरवर हत्येचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे.

धक्कादायक! एक कोटींच्या विमा पॉलिसीमध्ये लिव्ह-इन पार्टनर होता नॉमिनी; पैशाच्या लोभात त्याने प्रेयसीची केली हत्या
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी रायबरेली रोडवरील पीजीआय परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी एक महिला रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी महिलेला जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, यावेळी डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांना महिलेची ओळख पटवत घरच्यांना बोलावले. महिलेच्या भावाने महिला एका तरुणासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती असा दावा केली आणि त्या तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रायबरेली येथील रहिवासी गीता शर्मा पीजीआय येथील नीलगिरी अपार्टमेंटमध्ये राहत होती.
ती महिला गीता प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करायची. सकाळी सहाच्या सुमारास स्थानिक लोकांनी पोलिसांना एका महिलेच्या मृतदेहाबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले आणि त्यांना महिलेच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसल्या. महिलेच्या शरीरातून रक्तही वाहत होते. त्या महिलेला ताबडतोब पीजीआयच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ईसीजीसह अनेक चाचण्या केल्या, तपासणी दरम्यान तिला मृत घोषित केले.
तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला दुखापत झाल्याचे सिद्ध झाले. भाऊ लालचंद यांनी सांगितले की, त्याची बहीण अनेक वर्षांपासून रायबरेली येथील रहिवासी गिरिजा शंकर यांच्यासोबत लखनौमध्ये राहत होती.
भावाने हत्येचा केला आरोप
मृत महिलेच्या भावाने महिलेची हत्या तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणाने केल्याचा आरोप केला. गिरिजा शंकर याने आधी सांगितले होते की त्यांच्या बहिणीला पीजीआय ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला पोस्टमार्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आले. भावाने सांगितले की गिरिजा शंकर माझ्या बहिणीसोबत अनेक वर्षांपासून राहत होता. बहिणीचा अपघात झालेला नाही तर गिरिजा शंकरने तिचा खून केला आहे.
१ कोटींचा विमा
भावाने सांगितले की, बहिणीच्या नावावर सुमारे १ कोटी रुपयांचा विमा आहे. याचा नॉमिनी स्वतः गिरिजा शंकर होता. पीजीआय निरीक्षकांनी सांगितले की, ती महिला अॅपेक्स ट्रॉमा सेंटरच्या मागे पडलेली आढळली. ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.