Crime News: तरुणीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार; लपविण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या दिल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 22:44 IST2021-10-11T22:43:13+5:302021-10-11T22:44:03+5:30
Crime News Rajasthan: राजस्थानातील झालावाड़ जिल्ह्याच्या मंडावर पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंद झाले आहे. शनिवारी मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. यामुळे तिच्या पालकांनी तिला स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले.

Crime News: तरुणीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार; लपविण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या दिल्या
झालावाड़ा/कोटा : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या एका तरुणीवर तिचा शेजारी गेल्या वर्षाभरापासून बलात्कार करत होता. गर्भवती राहिल्याचे समजताच गर्भपात करण्यासाठी तिला गोळ्या दिल्या. मात्र, तिच्या पोटात दुखू लागल्याने सारा प्रकार उघड झाला. (Rape case in Rajasthan.)
पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबाने तिचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. परंतू पोलिसांना संशय असल्याने तिचे खरे वय काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. ते समजल्यानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
झालावाड़ जिल्ह्याच्या मंडावर पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंद झाले आहे. शनिवारी मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. यामुळे तिच्या पालकांनी तिला स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. तेव्हा डॉ़क्टरांनी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आणि साऱ्या प्रकाराचे बिंग फुटले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शेजाऱ्याने मुलगी गर्भवती असल्याने गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या. यामुळे भूणाचा मृत्यू झाला आहे. पीडितेच्या पालकांनी दाऊद नावाच्या शेजाऱ्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडितेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.