खळबळजनक! नोकरावर जीव जडला, पित्याने विरोध केला; लेकीने वडिलांचाच काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:22 IST2022-11-07T11:15:38+5:302022-11-07T11:22:47+5:30

Crime News : एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पित्याची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.

Crime News meerut after falling in love with servant daughter kills father in meerut | खळबळजनक! नोकरावर जीव जडला, पित्याने विरोध केला; लेकीने वडिलांचाच काटा काढला

फोटो - news18 hindi

उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पित्याची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लेकीने हत्येनंतर वडिलांचा मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ट्यूबवेलमध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरला. मेरठच्या बहसूमा परिसरातील राहवती गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यभान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सत्यभानची सावत्र मुलगी सिमरन हिचा तिच्याच घरात नोकर असलेल्या आशिषवर जीव जडला होता. त्यानंतर काही दिवसांतच आशिष आणि सिमरनच्या प्रेमकहाणीबद्दल वडिलांना समजलं. हे समजताच ते संतापले. वडील सत्यभान यांनी सावत्र मुलगी सिमरनला मारहाण केली. या मारहाणीमुळे सिमरन संतापली आणि तिने रागाच्या भरात वडिलांच्या हत्येचा कट रचला.

रात्री आशिष आणि सिमरनने वडिलांची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह पेंढ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. मात्र, दोन दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ मृतदेह ट्यूबवेलमध्ये पुरण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांना समजल्यावर खळबळ उडाली. सत्यभान हे 30 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते, यावरून गावात विविध चर्चा सुरू होत्या. 

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत मुलीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून सत्यभानचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Crime News meerut after falling in love with servant daughter kills father in meerut