शेतात काम करताना 5 मुलांची आई पडली तरुणाच्या प्रेमात; लव्हस्टोरीचा झाला भयंकर अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:42 IST2024-03-26T17:33:55+5:302024-03-26T17:42:01+5:30

शेतात काम करताना एक विवाहित महिला तरुणाच्या प्रेमात पडली पण या लव्हस्टोरीचा भयंकर अंत झाला आहे.

Crime News married woman fell in love with boy while harvesting | शेतात काम करताना 5 मुलांची आई पडली तरुणाच्या प्रेमात; लव्हस्टोरीचा झाला भयंकर अंत

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करताना एक विवाहित महिला तरुणाच्या प्रेमात पडली पण या लव्हस्टोरीचा भयंकर अंत झाला आहे. आपल्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा असं या विवाहित महिलेचं नाव असून तिला पाच मुलं होती. तिचा नवरा मजुरी करायचा. चार वर्षांपूर्वी शेतात काम करण्यासाठी रेखा जायची. त्यावेळी ती सुखवीर यादवच्या प्रेमात पडली. तिच्या नवऱ्याने तिला अनेकदा समज दिली पण तिने नवऱ्याचं ऐकलं नाही. घरातून पैसे आणि दागिने घेऊन ती बाहेर पडली. तिने कुटुंबीयांना बाहेर जात असल्याचं सांगितलं.

बराच वेळा झाला तरी पत्नी घरी परत न आल्याने पतीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याच दरम्यान रेखा तिचा प्रियकर सुखवीरकडे पळून आली होती. मात्र सुखवीरने तिचा काटा काढण्याचा कट रचला. तिची हत्या केली तसेच मृतदेह देखील जाळला. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करत असताना सुखवीरला अटक केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला  आहे. 

एसपी दीक्षा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्विलान्सच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. त्याने रेखाची हत्या करून तिचा मृतदेह जाळला. आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. घटनास्थळावर मृतदेहाचे काही अवशेष मिळाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने रेखाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: Crime News married woman fell in love with boy while harvesting