रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 10:34 IST2022-05-31T10:32:34+5:302022-05-31T10:34:33+5:30

Crime News: राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांना फोनवरून धमकी देणारा हा नगर  नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथी भाऊसाहेब  शिंदे नावाचा इसम आहे. या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे.

Crime News: Man arrested for threatening Rupali Chakankar | रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर - राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांना फोनवरून धमकी देणारा हा नगर  नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथी भाऊसाहेब  शिंदे नावाचा इसम आहे. या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिंदे हा धमकी दिली त्यावेळी चिचोंडी पाटील या गावात होता. तो मूळचा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या व्यक्तीने चाकणकर यांना धमकीचा फोन करून पुढील 72 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून पन्नास मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील 72 तासात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली होती. दरम्यान या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीशी संपर्क केला असता ती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समजले होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्या व्यक्तीचा शोध घेतला असता ती नगर जवळील चिचोंडी पाटील या गावातील असल्याचे समजले. पोलिसांनी  त्या व्यक्तीला ताब्यात आहे.

Web Title: Crime News: Man arrested for threatening Rupali Chakankar