धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटलं; हळहळू तब्बल 20 लाखांचे दागिने केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:54 PM2021-08-01T17:54:13+5:302021-08-01T17:59:50+5:30

Crime News : घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटल्याची घटना समोर आली आहे. हळहळू करून तब्बल 20 लाखांचे दागिने लंपास केले आहेत.

Crime News maid stole jewelry worth rs 20 lakh kept at home 2 sisters arrested | धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटलं; हळहळू तब्बल 20 लाखांचे दागिने केले लंपास

धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटलं; हळहळू तब्बल 20 लाखांचे दागिने केले लंपास

Next

नवी दिल्ली - ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटल्याची घटना समोर आली आहे. हळहळू करून तब्बल 20 लाखांचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. उषा आणि सुमन अशी दोन्ही महिलांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उषा ज्या घरात काम करते. तिथे तिने आपल्या बहिणीसोबत मिळून लाखो रुपयांचे दागिने लुटले आहेत. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करण्यात यश आले असून त्यांनी त्यांच्याकडून तीन लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत.  

रॉयल पार्क सोसायटीमध्ये टॉवर नंबर 9 मधील एका फ्लॅटमध्ये सरन भट्टाचार्य राहतात. घरातील काम करण्यासाठी त्यांनी मे 2021 मध्ये एका महिलेला ठेवलं. त्याच महिलेने त्यांचे कपाटात ठेवलेले जवळपास 20 लाखांचे दागिने चोरी केल्याचा आता आरोप करण्यात आला आहे. घरातले दागिने लंपास झाल्याची माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता. त्यांना घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर याकूबपूर परिसरातून उषा आणि तिची बहीण सुमन हिला अटक केली आहे. 

रॉयल पार्क सोसायटीसह त्याच्या आजुबाजूच्या परिसरात या दोघी घरकाम करतात. या दोघींनी मिळून सरन भट्टाचार्य यांचे दागिने चोरी केले. त्यांच्याकडून आता पोलिसांनी तीन लाख रुपये जप्त केले असून बाकीच्या दागिन्यांचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले  आहे. मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार करुन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

बलात्कार करुन काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करून उकळले 1 कोटी, 3 किलो सोनं अन् 15 किलो चांदीचे दागिने 

फक्त पैसेच नाहीत तर सोन्या-चांदीचे दागिने देखील घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पीडितेच्या भावाने काही पैसे काढण्यासाठी आपली तिजोरी उघडली, तेव्हा तिथले पैसे गायब झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर हा सर्व भयंकर प्रकार उघड झाला. आरोपीने तरुणीकडू एक कोटींहून अधिक रोख रक्कम, तीन किलो सोनं आणि 15 किलो चांदीचे दागिने उकळले होते. पीडितेने चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये पीडितेची आरोपीशी ओळख झाली. निशित उर्फ मयूर बाफना असं नाव असलेला हा तरुण पीडितेच्या घरापासून दूर असणाऱ्या बडावदा गावात राहत होता. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. 2019 च्या मार्चमध्ये ही तरुणी घरी आली होती. तेव्हाच आरोपी निशितही तिच्या घरी आला, आणि तिला कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटोही घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुढे निशित तिच्याकडून पैसे उकळत राहिला.

Web Title: Crime News maid stole jewelry worth rs 20 lakh kept at home 2 sisters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app