Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:25 IST2025-09-25T19:25:09+5:302025-09-25T19:25:54+5:30
एक तरुण त्याच्या एक्टिव्हाने एका तरुणीला जाणूनबुजून धडक देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

फोटो - आजतक
इंदूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या एक्टिव्हाने एका तरुणीला जाणूनबुजून धडक देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस तपासात असं दिसून आलं की, हा एक गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत.
हिरा नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बराच काळ या तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. पण नंतर तरुणीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि बाहेर काम करू लागली.
इंदौर में एक्स गर्लफ्रैंड को युवक ने सरेआम स्कूटी से मारी जोरदार टक्कर, लिव इन में रहने का बना रहा था दबाव#Indore | #MadhyaPradeshpic.twitter.com/j424DXMHK1
— NDTV MP Chhattisgarh (@NDTVMPCG) September 25, 2025
आरोपीने याच दरम्यान पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तरुणीने नकार दिल्यावर तो प्रचंड रागावला आणि त्याने त्याच्या एक्टिव्हाने तिला जोरदार भररस्त्यात धडक दिली. यामुळे तरुणी रस्त्यावर पडली, ती जखमी झाली. वेदनेने विव्हळत होती. आरोपीवर याआधीच छेडछाड आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एडिशनल डीसीपी राजेश दंडोटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.