Crime News: प्रेयसीसाठी घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर केली अंत्यसंस्काराची तयारी, असं फुटलं भयानक हत्याकांडाचं बिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:42 IST2022-06-03T17:35:29+5:302022-06-03T17:42:41+5:30

Crime News: नात्यांना कलंकित करणाऱ्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशाच एका घटनेमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या फेऱ्यातून एका व्यक्तीवर त्याच्याच पत्नीची हत्या केल्याचा आरोप झाला आहे. हत्येचा आरोप असलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर प्रेयसीसोबत विवाह केला होता.

Crime News: Husband killed wife for girlfriend, then prepares for cremation | Crime News: प्रेयसीसाठी घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर केली अंत्यसंस्काराची तयारी, असं फुटलं भयानक हत्याकांडाचं बिंग 

Crime News: प्रेयसीसाठी घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर केली अंत्यसंस्काराची तयारी, असं फुटलं भयानक हत्याकांडाचं बिंग 

पाटणा - नात्यांना कलंकित करणाऱ्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशाच एका घटनेमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या फेऱ्यातून एका व्यक्तीवर त्याच्याच पत्नीची हत्या केल्याचा आरोप झाला आहे. हत्येचा आरोप असलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर प्रेयसीसोबत विवाह केला होता. दरम्यान, पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. मात्र त्याचवेळी मृत महिलेच्या सासरची मंडळी पोहोचली आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला. महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या लोकांना आरोपी बनवले आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर सासरची मंडळी फरार झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सीतामढी शहरातील मेहसोल ओपी क्षेत्रातील एका रंगेल पतीने प्रेयसीसाठी पत्नीचा काटा काढल्याचा आरोप होत आहे. या व्यक्तीने प्रेयसीसोबत लग्न केलं होतं. ही बाब जेव्हा पत्नीला समजली तेव्हा खळबळ उडाली. मृत महिलेचं नाव गायत्री देवी तर तिची हत्या करणाऱ्या पतीचं नाव करण मुखिया असल्याचे समोर आले आहे.

हत्या केल्यानंतर गायत्री देवी हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. तेव्हा याची कुणकुण तिच्या नातेवाईकांना लागली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गायत्रीच्या पतीसह सर्व कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर सासरची सर्व मंडळी फरार झाली आहे.

दरम्यान, माहिती मिळाल्यावर मेहसोल ओपी ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तपास सुरू केला आहे. दरम्यान, सासरच्या कुटुंबातील एक सदस्य रोहित कुमार याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हत्येचा आरोप असलेला पती फरार आहे.  

Web Title: Crime News: Husband killed wife for girlfriend, then prepares for cremation