Crime News: धक्कादायक घटना, अमेरिकेत मुलीला भेटून परतले पती-पत्नी, भारतात येताच झाली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 14:47 IST2022-05-08T14:45:12+5:302022-05-08T14:47:44+5:30

Crime News: ६० वर्षीय श्रीकांत आमि त्यांची पत्नी अनुराधा हे आपल्या मुलीला भेटून भारतात परतले होते. मात्र तेव्हापासूनच हे दाम्पत्य बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. 

Crime News: Husband and wife returned to the United States after meeting their daughter, murdered on arrival in India, shocking information came to light | Crime News: धक्कादायक घटना, अमेरिकेत मुलीला भेटून परतले पती-पत्नी, भारतात येताच झाली हत्या

Crime News: धक्कादायक घटना, अमेरिकेत मुलीला भेटून परतले पती-पत्नी, भारतात येताच झाली हत्या

चेन्नई - तामिळनाडूमधीलचेन्नईमध्ये पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, ६० वर्षीय श्रीकांत आमि त्यांची पत्नी अनुराधा हे आपल्या मुलीला भेटून भारतात परतले होते. मात्र तेव्हापासूनच हे दाम्पत्य बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. 

तपासामध्ये पोलिसांना समजले की, या दाम्पत्याचा कृष्णा नावाचा ड्रायव्हर होता. तो नेपाळमधील रहिवासी होता. त्याने दाम्पत्याला शनिवारी एअरपोर्टवरून रिसिव्ह केले. त्यानंतर पोलिसांना दाम्पत्याच्या फोन हिस्ट्रीमधून समजले की, हे दाम्पत्या अखेरच्या वेळी ड्रायव्हर कृष्णासोबत होते.

पोलिसांनी त्यानंतर या दाम्पत्याचा ड्रायव्हर कृष्णा आणि त्यांच्या एका मित्राला अटक केली. त्यांनी दोघांनी मिळून या वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली आहे. त्यांनी मैलापूरमध्ये द्वारका कॉलनीस्थित त्यांच्या घरातच या वृद्ध दाम्पत्याची हत्या केली. त्यानंतर या दाम्पत्याच्या नेमेल्लीमधील फार्महाऊसवर नेऊन त्यांचा मृतदेह दफन केला.

पोलिसांनी सदर फार्महाऊसमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवले. दरम्यान, या वृद्ध दाम्पत्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. तसेच पुढील तपास सुरू आहे. या ड्रायव्हरने वृद्ध दाम्पत्याची हत्या का केली याचा शोध घेतला जात आहे.  

Web Title: Crime News: Husband and wife returned to the United States after meeting their daughter, murdered on arrival in India, shocking information came to light