Crime News: पतीने पत्नीवर केला चोरीचा आरोप, पत्नी म्हणाली माझा पती बायोसेक्शुअल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:56 IST2022-03-23T11:55:59+5:302022-03-23T11:56:50+5:30

Crime News: येथे पती आणि पत्नीमधील भांडणाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीवर चोरीचा आरोप केला, तर पत्नीने सांगितले की, तिचा पती हा बायोसेक्शुअल आहे. ही घटना अहमदाबादमधील आहे.

Crime News: Husband accuses wife of theft, wife says my husband is biosexual | Crime News: पतीने पत्नीवर केला चोरीचा आरोप, पत्नी म्हणाली माझा पती बायोसेक्शुअल 

Crime News: पतीने पत्नीवर केला चोरीचा आरोप, पत्नी म्हणाली माझा पती बायोसेक्शुअल 

नवी दिल्ली - येथे पती आणि पत्नीमधील भांडणाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीवर चोरीचा आरोप केला, तर पत्नीने सांगितले की, तिचा पती हा बायोसेक्शुअल आहे. ही घटना अहमदाबादमधील आहे. या प्रकरणी ३२ वर्षांच्या डॉक्टरने कृष्णानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, त्याच्या पत्नीने रुग्णालयातून स्कॅनर मशीन चोरली आहे. त्यानंतर पत्नीनेसुद्धा पतीविरोधात तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की, तिचा पती हा बायोसेक्शुअल आहे. तसेच तिने पतीवर वैवाहित बलात्काराचाही आरोप केला आहे. डॉक्टर पती एका रुग्णालयामध्ये आय सर्जन आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांचाही विवाह झाला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांचाही हा दुसरा विवाह आहेत. पहिल्या लग्नातून पत्नीचा एक ११ वर्षांचा मुलगा आहे. दोघांचेही वैवाहिक जीवन समाधानात चालले होते. मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. तक्रारीमध्ये डॉक्टर पतीने सांगितले की, रविवारी सकाळी त्याच्या पत्नीसोबत त्याचे भांडण जाले. त्यानंतर ते घरातून बाहेर गेले. तसेच रात्रभर बाहेर राहिले.

सोमवारी सकाळी ते आले आणि रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिथून तीन लाख रुपयांची स्कॅनर मशीन आणि २० हजार रुपयांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची डीव्हीआर एलईडी स्क्रिन गायब झालेली होती. त्यांनी चौकशी केली असता रुग्णालयासमोरील मेडिकल स्टोअरच्या मालकाने सांगितले की, डॉक्टरांच्या पत्नीने संध्याकाळी चावी घेतली होती. मात्र ती तिने परत केलेली नाही.

दरम्यान, पत्नीनेही पतीविरोधात उलट तक्रार केली आहे. तसेच तिने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच लग्नानंतर पती बायोसेक्शुअल असल्याचे आपल्याल समजले असा गंभीर आरोपही तिने केला.  

Web Title: Crime News: Husband accuses wife of theft, wife says my husband is biosexual