नात्याला काळीमा! जन्मदाताच झाला हैवान; 13 वर्षीय मुलीवर केला बलात्कार, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 15:21 IST2021-10-31T15:20:42+5:302021-10-31T15:21:57+5:30
Crime News : एका व्यक्तीने आपल्याच 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नात्याला काळीमा! जन्मदाताच झाला हैवान; 13 वर्षीय मुलीवर केला बलात्कार, परिसरात खळबळ
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाताच हैवान झाला असून 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. हमीरपूर जिल्ह्यातील एका गावात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीसोबत घडलेल्या या प्रकारानंतर ती खूप घाबरली होती. तिने आपल्या आईला या भयंकर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईनेच हमीरपूर येथे जाऊन पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये देखील बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते फरार आरोपीचा शोध घेत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
घाबरलेल्या 'तिने' आईला सांगितला घडलेला प्रकार अन्...
अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीने रडत रडत वडिलांनी तिच्यासोबतच केलेल्या दुष्कृत्याची आईला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपीला लवकरात लवकर पकडा असं देखील महिलेने म्हटलं आहे. हमीरपूरच्या एसपी आकृती शर्मा यांनी महिलेने मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक कसून तपास करण्यात येत आहे. आरोपीला लवकरच पकडण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.