Crime News: मित्रासोबत लग्न करण्यासाठी केलं लिंग परिवर्तन, रवीचा बनला रिया, त्यानंतर मित्राने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:08 IST2022-03-31T15:08:15+5:302022-03-31T15:08:48+5:30
Crime News: लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने त्याचा मित्र असलेल्या तरुणाचं लिंग परिवर्तन करून घेत त्याला मुलगी बनवलं. त्यानंतर लग्न करून त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर केले. मात्र नंतर त्याला सोडून दिलं.

Crime News: मित्रासोबत लग्न करण्यासाठी केलं लिंग परिवर्तन, रवीचा बनला रिया, त्यानंतर मित्राने दिला नकार
चंदीगड - पंजापमधील अमृतसर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने त्याचा मित्र असलेल्या तरुणाचं लिंग परिवर्तन करून घेत त्याला मुलगी बनवलं. त्यानंतर लग्न करून त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर केले. मात्र नंतर त्याला सोडून दिलं. आता हा मित्र मुलगी बनलेल्या आपल्या मित्राला किन्नरांच्या हवाली करण्याच्या प्रयत्नात आहे. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून पोलीस रिया बनलेल्या रोहितला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तीन वर्षांपूर्वीपर्यंत रिया रवी होता. तसेच मित्र अर्जुनसोबत एकाच ठिकाणी कामाला होता. हळुहळू रवी आणि अर्जुन यांच्यातील मैत्री अधिकाधिक गाढ झाली. तेव्हा अर्जुनने रवीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यासाठी रवीने मुलगी बनावे, अशी अट त्याने घातली. त्यानंतर रवीने आपले लिंगपरिवर्तन करून घेतले आणि तो रिया बनला.
रवी उर्फ रियाचे सांगणे आहे की, त्याचं आधीचं नाव रवी होतं. मात्र लिंगपरिवर्तन केल्यानंतर अर्जुननं त्याचं नाव रिया जट्टी असं ठेवलं. अर्जुन हा जंडियाला येथील रहिवासी आहे. त्याने रवीला लग्नापूर्वी लिंगपरिवर्तन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. अर्जुनच्या कुटुंबीयांनीही रियाला (रवी) स्वीकारलं. त्यानंतर काही दिवसांनी अर्जुनने त्याला सोडले. आता तो रियाला किन्नरांच्या हवाली करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र रियाला अर्जुनसोबत राहायचं आहे. कारण या सर्वांमध्ये त्याचं जीवन खराब झालं आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस इन्स्पेक्टर जसबीर सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे तक्रार आली आहे. रविने अर्जुनसोबत विवाह करण्यासाठी आपलं लिंग बदललं होतं. ते या प्रकरणात तपास करत आहेत. आता या प्रकरणात जो आरोपी सापडेल, त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.