Crime News: तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:36 IST2022-02-13T10:34:10+5:302022-02-13T10:36:30+5:30

Crime News: नोकरी देण्याच्या बहाण्याने दिल्लीतील तरुणीला चुरू येथे बोलावले आणि तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Crime News: Gang rape of a 25 year old young girl in Churu Rajasthan | Crime News: तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

Crime News: तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

चुरू: राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. जिल्हा मुख्यालयाच्या धर्मस्तुपा पोलिस चौकीपासून अवघ्या काही अंतरावरच दिल्लीतील एका 25 वर्षीय तरुणीवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी दारुच्या नशेत तरुणीला दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरुन फेकून दिले. सुदैवाने दोरी विजेच्या खांबाला अडकली आणि तरुणीचा जीव वाचला.

सुमारे दोन तास तरुणी विजेच्या खांबाला लटकून होती. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चुरुच्या इंद्रपुरा येथील रहिवासी विक्रम सिंग, भवानी सिंग, देवेंद्र सिंग आणि चैनपुरा येथील बुल्ला उर्फ ​​सुनील या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भवानी सिंह सरकारी शाळेत शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेतील सर्व आरोपी  फरार असून, पोलिस आरोपींच्या शोध घेत आहे.

पीडित महिला आसामची रहिवासी

पोलिस उपअधीक्षक ममता सारस्वत यांनी सांगितले की, पीडित तरुणी ही मूळची आसामची आहे. सध्या ती दिल्लीत राहते, तर आई आणि भाऊ आसाममध्ये राहतात. पीडितेने सांगितले की, चुरू येथील रहिवासी सुनील उर्फ ​​राजू याने तिला काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन चुरू येथे बोलावले होते. 

आळीपाळीने बलात्कार
या ठिकाणी एका रुमवर नेऊन विक्रम राजपूत, भवानी, देवेंद्र सिंग उर्फ ​​बुल्ला आणि सुनील राजपूत चैनपुरा बडा तिथे आले आणि त्यांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिचे हात-पाय दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून ढकलून दिले. मात्र हातात बांधलेली दोरी विजेच्या खांबामध्ये अडकल्याने ती तिथेच लटकली आणि वाचली. 

Web Title: Crime News: Gang rape of a 25 year old young girl in Churu Rajasthan