Crime News: मित्राने गंमत केली, तरुणाच्या जीवावर बेतली, वाढदिवसाच्या पार्टीत भयानक दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:25 IST2022-08-22T17:25:06+5:302022-08-22T17:25:53+5:30
Accident In Birthday Party: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यामध्ये एका तरुणाचा मित्रांनी केलेल्या गमतीमध्ये जीव गेला. हा तरुण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आला होता.

Crime News: मित्राने गंमत केली, तरुणाच्या जीवावर बेतली, वाढदिवसाच्या पार्टीत भयानक दुर्घटना
जयपूर - राजस्थानमधील कोटा जिल्ह्यामध्ये एका तरुणाचा मित्रांनी केलेल्या गमतीमध्ये जीव गेला. हा तरुण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आला होता. पार्टीमध्ये मद्यपान करत असताना एक तरुणाने त्याच्यासोबत अशी काही गंमत केली की, तो गडबडीत टेरेसवरून उडी मारू लागला. त्यादरम्यान, तो ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर त्या तरुणाचे मित्र घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवागारात पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवसापूर्वी सिमलिया पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये हा प्रकार घडला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण तेजपूर वस्ती येथील राहणारा होता. त्याच्याविरोधात कुठल्यातरी गुन्ह्यात सिमलिया पोलीस ठाण्यातून वॉरंट जारी झालेले होते. दोन तीन दिवसांपूर्वी पोलीस नरेशला शोधण्यासाठी त्याचा घरी गेले होते. मात्र तो सापडला नव्हता.
दरम्यान, शनिवारी रात्री नरेश बाबा रक्तया भैरूजी मंदिर परिसरामध्ये त्याच्या कुठल्या तरी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आला होता. तिथे त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केले. रात्री सुमारे १० वाजता केक कापल्यानंतर मित्रांनी गमती गमतीमध्ये पोलीस येणार असल्याचे सांगितले. हे ऐकून नरेश घाबरला. तसेच तिथून पळून टेरेसवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. या दरम्यान, त्यााव तिथून जाणाऱ्या वीजेच्या ११ केव्ही लाईनचा आंदाज आला नाही. त्याचा या तारांना स्पर्श झाला. तसेच त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हा प्रकार पाहून तिथे पार्टी करत असलेले मित्र घाबरले. तसेच घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना कुणीतरी दिली. मग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तसेच मृत तरुणाच्या काकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.